Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी डान्स करताना तो जवळ आला अन् किस केलं...", डान्सर सपना चौधरीसोबत गँगस्टरच्या पार्टीत घडलेली विचित्र घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:16 IST

सपना चौधरी ही एक प्रसिद्ध डान्सर आहे. नुकतंच तिने शोमध्ये तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला. गँगस्टरच्या पार्टीत डान्स करणं सपना चौधरीच्या जीवावर बेतू शकलं असतं. डान्स करताना एकाने स्टेजवर येऊन किस केल्याचंही सपना म्हणाली. 

सपना चौधरी ही एक लोकप्रिय स्टार आहे. अनेक रिएलिटी शोमध्ये ती दिसली होती. बिग बॉस, द ५० या शोमध्ये ती दिसली होती. सपना चौधरी ही एक प्रसिद्ध डान्सर आहे. नुकतंच तिने शोमध्ये तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला. गँगस्टरच्या पार्टीत डान्स करणं सपना चौधरीच्या जीवावर बेतू शकलं असतं. डान्स करताना एकाने स्टेजवर येऊन किस केल्याचंही सपना म्हणाली. 

सपना चौधरीने सांगितलं की "एक वेळ अशी आलेली जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते. कोणता तरी शो मिळावा अशी अपेक्षा आम्ही करत होतो. तेवढ्यात रात्री मला एका शोसाठी फोन आला. दुसऱ्या दिवशी रात्री हा शो होणार होता. मागचा पुढचा काहीही विचार न करता मी शोसाठी होकार देऊन टाकला. मी तो शो करण्यासाठी इतकी उत्सुक होते की मी त्यांना काहीच विचारलं नाही. शो नक्की काय आहे? कुठे होणार आहे आणि मला काय करावं लागेल? हे मी काहीच विचारलं नाही". 

"दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही एका फार्महाऊसवर गेलो. आतमध्ये गेल्यावर पाहिलं की तिथे २५-२६ टेबल लागलेले होते आणि त्या प्रत्येक टेबलावर एक हत्यार ठेवलेलं होतं. ते लोक गँगस्टर असल्याचं वाटत होतं. कोणीतरी जेलमधून सुटून आलं आहे आणि त्याची पार्टी होत आहे, असं वाटत होतं. सुरुवातीला मी गाणं गायलं. त्यानंतर जेव्हा मी एकटीच डान्स परफॉर्म करायला गेले तेव्हा एक माणूस माझ्या जवळ येत होता आणि माझ्या कानात काहीतरी बोलत होता. तिथे ५०-५५ लोक होते. माझ्या आईने त्यांना विनंती केली की आम्हाला जाऊ दे. पण ते आम्हाला म्हणाले की आधी डान्स कर आणि मग जा...", असं सपना चौधरीने सांगितलं. 

पुढे ती म्हणाली, "मी खूप घाबरले होते. मला वाटत होतं की ते आम्हाला गोळ्या घालतील. मी स्टेजवर जाऊन डान्स करत होते. तेव्हा एक माणूस माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या गालावर किस केलं. मी लगेचच स्टेजवरुन उतरले आणि स्टेजच्या मागे जाऊन बसले. मी त्यांना सांगितलं की मी हे सगळं नाही करणार. नंतर माझी आई त्यांना म्हणाली की कोणाच्या तरी बहीण-मुलीला बोलवून तुम्ही असं करता का? त्यानंतर आम्ही तिथून निघालो. पण मला वारंवार वाटत होतं की कोणीतरी आम्हाला पाठीमागून गोळी मारेल". 

English
हिंदी सारांश
Web Title : Sopna Choudhary: Dancer recounts shocking incident at gangster party, kissed on stage.

Web Summary : Dancer Sopna Choudhary recounts a terrifying experience at a gangster's party. Desperate for work, she agreed to perform, only to find herself dancing before armed men. During her performance, one man kissed her, prompting a hasty and fearful exit.
टॅग्स :टिव्ही कलाकारसपना चौधरी