Join us
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती बालगुडेच्या फोटोपेक्षा नेहा पेंडसेच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:58 IST

नेहा आणि संस्कृतीच्या या संवादाने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विविध सिनेमात संस्कृती (Sanskruti Balgude)ने भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. वेगवेगळ्या विषयांवर सकारात्मक विचार मांडताना दिसते. सोशल मीडियावर संस्कृतीचे प्रचंड चाहते आहेत. तिने शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. संस्कृतीने लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधलं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिचं हे फोटोशूट बघून चाहते घायाळ झाले आहे.  लाल छडी मैदान खडी.. असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान यासगळ्यात अभिनेत्री नेहा पेंडसेच्या कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. नेहाने कमेंटमध्ये विचारलं तिला, 'कोणासाठी?'

नेहाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना संस्कृतीने लिहिलं, 'जे कोणी असतील, त्यांना समजलं असेलच'. त्यावर नेहा पुढे म्हणाली, 'अगं बाई, या मुलीने अनेकवचन वापरलं आहे.' नेहा आणि संस्कृतीच्या या संवादाने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. संस्कृतीनं कोणाकडे इशारा केला आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असावा.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.

टॅग्स :संस्कृती बालगुडेनेहा पेंडसे