Join us
Daily Top 2Weekly Top 5

"संक्रांत कित्ती गोड झाली... नाट्य क्षेत्रातले ३ दिग्गज भेटले", संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 18:05 IST

Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी कलाविश्वामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच संकर्षण एक संवेदनशील लेखक आणि कवी म्हणूनही ओळखला जातो. संकर्षणने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच संकर्षण सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. 

संकर्षण कऱ्हाडे याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, संक्रांत कित्ती गोड झाली. नाट्य क्षेत्रातले ३ दिग्गज भेटले. जेष्ठं निर्माते दिलीप जाधव कामांत शिस्तं असणारे आणि नटांना शिस्तीत ठेवणारे चंकु सर आणि सदाबहार आणि प्रशांत दामले….. तिघांचाही अनुभव माझ्या वयापेक्षाही जास्तं आहे ! काही मिनिटं जरी ह्यांच्यासोबत, आजूबाजूला असायला मिळाले की; तिळगुळाचा गोडवाही मिळतो, ऊर्जाही.. आणि संक्रातीच्या दिवशी पतंगासारखं हवेत असल्यासारखं वाटतं. संक्रांतीच्या तुम्हालाही खूप शुभेच्छा. गोड बोला…. आनंदी रहा … आशीर्वाद शुभेच्छा द्या.

वर्कफ्रंट..संकर्षण कऱ्हाडे हा मुळचा परभणीचा आहे. 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' हा संकर्षणचा डायलॉग फेमस आहे. २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या आभास हा या मालिकेच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. संकर्षणने मला सासू हवी, 'खुलता कळी खुलेना' आणि माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केले आहे.सध्या संपुर्ण महाराष्ट्रात त्याच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या नाटकांचे प्रयोग सुरू आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेता