Join us

परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:20 IST

संकर्षण कऱ्हाडेने परभणीतील रत्नांबद्दल खास पोस्ट शेअर करुन सोशल मीडियावर सर्वांना ही माहिती सांगितली आहे

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणला आपण विविध सिनेमे, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. संकर्षण रंगभूमीवरही सक्रीय असतो. संकर्षण सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन त्याच्या गावाबद्दल आणि त्याच्या जवळच्या माणसांबद्दल पोस्ट करुन माहिती सांगत असतो. अशातच संकर्षणने एक नवीन पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये तो परभणीतील दोन रत्नांबद्दल सर्वांना माहिती सांगताना दिसत आहे. जाणून घ्या.

संकर्षणने व्हिडीओ शेअर करत याविषयी पोस्ट लिहिली आहे. संकर्षण लिहितो की, ''लोक मला खूपदा विचारतात…तुमच्या परभणीत काय स्पेशल आहे..? मी आत्मविश्वासाने सांगतो “मा ण सं…” , “क ला का र…” पोस्ट करतोय त्या व्हिडियोमध्ये २ माणसं गातायेत… नक्की ऐका … दर्दी असाल तर, तुमचे ३ मिनिटं छान जातील …पांढरी टोपी घातलेले “यज्ञेश्वर लिंबेकर…” जे सारेगमप च्या मोठ्या माणसांच्या पर्वाचे महागायक ठरले होते … आणि हिरव्या सदऱ्यामध्ये “कृष्णराज लव्हेकर…” (ज्यांच्याकडे मला शिकण्याचं भाग्यं मिळालं…) हि दोन्ही माणसं परभणीतली रत्नं आहेत… त्यांचा आवाज ऐका…''

''एक वाघासारखा आक्रमक दुसरा हरणासारखा हळूवार… परभणीत असे अनेक वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत असलेली माणसं आहेत… माझी खात्री आहेत तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या गावांत अशी ग्लॅमरपासून लांब असलेली गुणी माणसं असतात… एकमेकांना आदर देणारी , कुणाशी स्पर्धा नं करणारी … “अशी मोठी माणसं गावांत राहून लहान रहातात… आपण लहान माणसं शहरांत येउन मोठे होतो … “ आहेत का तुमच्या गावांत असे कलाकार …?'' अशी पोस्ट लिहून संकर्षणने सर्वांना परभणीच्या या दोन रत्नांबद्दल सांगितलं आहे.

टॅग्स :संकर्षण कऱ्हाडेपरभणी महानगरपालिकापरभणीमराठी गाणीमराठी अभिनेता