Join us  

‘संजू’ची फॅन्ससोबत धमाल-मस्ती; विशेष स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:20 AM

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ सिनेमा नुकताच रुपेरी पडद्यावर झळकला.

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ सिनेमा नुकताच रुपेरी पडद्यावर झळकला.सिनेमाला मिळणारा तुफान प्रतिसाद आणि रणबीरची क्रेझ पाहता गोरेगावमधील (मुंबई) पीव्हीआर येथे रविवारी या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यातआले होते. या वेळी अभिनेता रणबीर कपूर याने फॅन्ससोबत धमाल-मस्ती केली.याप्रसंगी ‘लोकमत’ समूहाचे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणबीरला पुणेरी पगडी घालून त्याचा गौरव केला. संजू सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘लोकमत’ने केलेल्या सहकार्याबद्दल हिरानी यांनी विशेष आभारही व्यक्त केले.दरम्यान, फॅन्सना रणबीरसोबत सेल्फी काढण्याची संधी या वेळी मिळाली. तसेच रणबीरने उपस्थितांशी मनमोकळा संवादही साधला. या सिनेमाची निर्मिती आणि सिनेमाला सुरुवातीपासून मिळणारे यश; याबाबत रणबीरने खूप गप्पा मारल्या. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केली. संजू अर्थात संजय दत्त साकारणे खरेच खूप आव्हानात्मक होते, असे रणबीरने सांगितले. मात्र हिरानी यांची स्क्रीप्ट आणि प्रयत्न इतका प्रामाणिक होता की, सगळे आपसूक होत गेले, असेही रणबीरने नमूद केले.रणबीरची एक झलक पाहायला मिळावी, त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करता यावे किंवा त्याच्यासह सेल्फीची संधी मिळावी, यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. रणबीरनेही त्याच्या फॅन्सना निराश केले नाही आणि विविध पोज देत त्यांच्यासह फोटो अन् सेल्फी काढले. तसेच संजू स्टाइल डॉयलॉग बोलून दाखवत उपस्थितांची मने जिंकली.१०० कोटींचा टप्पा ओलांडलासंजूची भूमिका रणबीरने रुपेरी पडद्यावर अत्यंत सकसपणे साकारली आहे. रणबीरच्या अभिनयाचे आणि सिनेमाच्या कथेचे तसेच राजकुमार हिरानी यांचे सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. सिनेमाने तिकीट खिडकीवर आतापर्यंत १०० कोटींचा टप्पाही ओलांडला आहे.

टॅग्स :संजू चित्रपट 2018मुंबईसिनेमा