Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतक्या मुलींसोबत संजय दत्तचं होतं फिजिकल रिलेशन, आकडा वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 16:19 IST

सध्या या सिनेमच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे या ट्रेलरमधून अनेक संजय दत्तबाबत अनेक गोष्टींचे खुलासेही झाले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत 'संजू' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूर हा संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या सिनेमच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे या ट्रेलरमधून संजय दत्तबाबत अनेक गोष्टींचे खुलासेही झाले आहेत. 

संजय दत्तचं जीवन हे एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. इतकी उलथापालथ कोणत्याही कलाकाराच्या वाट्याला आली नसेल. संजय दत्त आणि त्याची अफेअर्सही फार गाजलीत. त्याचाच या सिनेमात खुलासा झाला आहे. त्यांची किती लग्ने आणि किती अफेअर्स होते हे तुम्हाला माहीत असेल. पण त्याचे किती मुलींसोबत फिजिकल रिलेशन होते याचाही खुलासा ट्रेलरमधून झालाय. 

या सिनेमातील एका सीनमध्ये अनुष्का जी त्याची वकील दाखवण्यात आलीये. ती त्याला एक प्रश्न करते. तुझे किती मुलींसोबत फिजिकल रिलेशन होते? असा तो प्रश्न आहे. यावर संजय दत्त याने दिलेलं उत्तर सर्वांनाच धक्का देणारं आहे. 308 पेक्षा जास्त मुलींसोबत त्याचं फिजिकल रिलेशन होतं असं त्याचं उत्तर आहे. 

टॅग्स :संजय दत्तबॉलिवूडरणबीर कपूरसंजू चित्रपट 2018माधुरी दिक्षित