Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी तो बनती है...! ‘संजू’च्या अख्ख्या टीमने साजरी केली सक्सेस पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 08:59 IST

चित्रपट बॉक्सआॅफिसवरचे एकापाठोपाठ एक असे अनेक विक्रम मोडीत काढत असताना संजू’ची टीम जाम खूश आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी ‘संजू’च्या अख्ख्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. 

‘संजू’ने बॉक्सआॅफिसवर धम्माल केलीय, ‘पार्टी तो बनती है’. होय, सध्या ‘संजू’ची स्टार पूर्णपणे ‘पार्टीमूड’मध्ये आहे. विशेषत: ‘संजू’मध्ये लीड भूमिका साकारणारा रणबीर कपूर तर अतिशय उत्साहात आहे. चार दिवसांत या चित्रपटाने १२० कोटींपेक्षा अधिक बिझनेस केला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाने समीक्षक व प्रेक्षक दोघांचीही मने जिंकलीत. चित्रपट बॉक्सआॅफिसवरचे एकापाठोपाठ एक असे अनेक विक्रम मोडीत काढत असताना संजू’ची टीम जाम खूश आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी ‘संजू’च्या अख्ख्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. 

या सक्सेस पार्टीत अनेक जण पोहोचले. रणबीर कपूर, दीया मिर्झा, मनीषा कोईराला, करिश्मा तन्ना यांच्यासोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि ‘संजू’चे लेखक अभिजात जोशी हे यावेळी दिसले.

 

या सक्सेस पार्टीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही फोटो खास आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.

‘संजू’ हा यंदाचा सर्वात मोठा वीकेंड ओपनर चित्रपट ठरला आहे. गत रविवारी या चित्रपटाने सर्वाधित ४६ कोटींपेक्षा अधिक रूपयांचा गल्ला जमवला. आधी हा विक्रम ‘बाहुबली2’च्या नावावर होता.

टॅग्स :संजू चित्रपट 2018