Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय कपूरने शेअर केलेल्या जुन्या फोटोत पाहायला मिळतेय चिमुकली करिश्मा कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 17:49 IST

संजय कपूरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देया फोटोत आपल्याला तरुणपणातील संजय कपूर दिसत आहे. तसेच राज कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता राजीव कपूर देखील या फोटोत पाहायला मिळत आहे. पण त्याचसोबत त्यांच्या दोघांसोबत एक गोड मुलगी दिसत आहे. ही मुलगी दुसरी कोणीही नसून अभिनेत्री करिश्मा कपूर आहे.

संजय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात १९९५ साली आलेल्या प्रेम या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्याची अभिनेत्री होती तब्बू. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. यानंतर तो दिसला बॉलिवूड दिवा माधुरी दीक्षितसोबत राजामध्ये. हा चित्रपट संजय कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटानंतर रातो-रात तो स्टार बनला. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र या चित्रपटानंतर संजयला म्हणावे तसे यश मिळाले नाही. यानंतर त्याने तीन चित्रपटांची देखील निर्मिती केली.  

संजयने काही महिन्यांपूर्वी दिल संभल जा जरा य मालिकेत देखील काम केले होते. पण या मालिकेला देखील प्रेक्षकांचे म्हणावे तसे प्रेम मिळाले नाही. संजय चित्रपट, मालिकांमध्ये खूप कमी काम करत असला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असतो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तो नेहमीच काही ना काही तरी पोस्ट करत असतो. त्यामुळे त्याचे चाहते मोठ्या संख्येने त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत आपल्याला तरुणपणातील संजय कपूर दिसत आहे. तसेच राज कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता राजीव कपूर देखील या फोटोत पाहायला मिळत आहे. पण त्याचसोबत त्यांच्या दोघांसोबत एक गोड मुलगी दिसत आहे. ही मुलगी दुसरी कोणीही नसून अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. या फोटोत चिमुकली करिश्मा खूपच छान दिसत आहे. राजीव हे करिश्माचे काका असून ती तिच्या काकांसोबत एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आली असेल आणि त्यावेळी हा फोटो काढला असेल असेच हा फोटो पाहून वाटत आहे. 

विशेष म्हणजे याच संजय कपूर सोबत अनेक वर्षांनंतर करिश्माने चित्रपटामध्ये काम केले होते. संजय कपूर आणि शाहरुख खान यांच्यासोबत करिश्मा कपूर ‘शक्ती’ या चित्रपटात झळकली होती.  

टॅग्स :संजय कपूरकरिश्मा कपूर