Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टारकिड शनाया कपूरच्या बेली डान्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 19:49 IST

शनाया कपूरने यापूर्वी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अनेक स्टार्सची मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, आता शनायामुळे या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे.

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे संजय कपूरची मुलगी शनाया कपूरसुद्धा नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूड सिनेमात पदार्पणाविषयी अजूनतरी अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही तो सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे धुमाकुळ घालत असते.

रूपेरी पडद्यावर झळकण्याआधीच ती सोशल मीडियावर हिट ठरतेय. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती बेली डान्स करताना पाहायला मिळतेय. शनायाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शेअर झाल्यापासून हा व्हिडीओ वारंवार नेटीझन्स पाहात आहेत. आतपर्यंत १६हजारांहून अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. व्हिडीओत शनायाचे डान्स मुव्ह्ज आणि चेह-यावरचे हावभाव पाहून नेटीझन्स फुल ऑन फिदा होत आहेत. 

संजय कपूर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत  शनायाच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी सांगितले,शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं माहिती संजय कपूर यांनीच दिली होती. कोरोनामुळे तिच्या पदार्पणाला उशीर झाला. शनायाने यापूर्वी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अनेक स्टार्सची मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, आता शनायामुळे या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे.

चुलत बहिण सोनमप्रमाणेच फॅशनिस्टा अशी शनाया कपूरची ओळख आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.

स्टार किड असूनही शनायाल स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते. मात्र सोनमच्या लग्नाच्या निमित्ताने शनायाचा ग्लॅमरस अंदाज साऱ्यांनी अनुभवला होता. हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शनाया कपूरसुद्धा लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या.     

टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूर