Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेब्यू आधीच संजय कपूरच्या मुलीने आपल्या डान्सने लावली सोशल मीडियावर आग, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:31 IST

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचा डेब्यू सुरु आहे. अनन्या पांडे, सारा अली खान, इशान खट्टर आणि लवकरच किंग खानची मुलगी सुहाना खानही हॉलिवूडच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचा डेब्यू सुरु आहे. अनन्या पांडे, सारा अली खान, इशान खट्टर आणि लवकरच किंग खानची मुलगी सुहाना खानही हॉलिवूडच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.

अनन्या आणि सुहानाची बेस्ट फ्रेंड शनाया कपूरचा बेली डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. संजय कपूरची मुलगी शनाया कपूरचा हा व्हिडीओ बघून ती डान्सची जबरदस्त प्रॉक्टिस करताना दिसतेय. हा व्हिडीओ शनायाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

 शनाया संजय कपूर आणि माहीप कपूर यांची मुलगी आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.

हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून शनायाने डेब्यू केलाय. शनायाला अभिनेत्री बनायचे आहे. पण त्यापूर्वी अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतील सर्व बारकावे शिकण्याकडे तिचा कल आहे. याचमुळे हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याचा अनुभव तिला घ्यायचा आहे.  आपली चुलत बहीण जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' सिनेमाची ती अस्टिस्टंट डायरेक्टर आहे. हा सिनेमा 13 मार्चला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूर