Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जलसा’ झाला सॅनिटाइज, अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर ‘कन्टेन्मेंट झोन’चे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 12:06 IST

अमिताभ बच्चन यांचा बंगला 'जलसा' कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे   ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही कोरोना चाचणी झाली. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जलसामध्ये सॅनिटाइजेशनचे काम सुरू आहे. शनिवारी रात्री अमिताभ आणि अभिषेक यांनी स्वत: त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर आज सकाळी बीएमसीचे कर्मचारी जलसावर धडकले. जलसा व संपूर्ण परिसर सॅनिटाइज केला गेला. 

सॅनिटाइज करण्यासाठी आलेल्या सर्व कर्मचा-यांनी पीपीई किट घातले होते. 

तूर्तास अमिताभ यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाचा हलकी लक्षणे आहेत. त्यांना रुग्णालयातील आयसोलेशन युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे. अमिताभ स्वत: ट्विवटवरुन आपल्या आरोग्यासंदर्भात माहिती देत राहतील, असेही रुग्णालयाने स्पष्ट केलेआहे.  

अमिताभ यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यालाही कोरोनाची लागण झाली आहे.   ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही कोरोना चाचणी झाली. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.     

टॅग्स :अमिताभ बच्चन