Join us
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम-खुशबू आईबाबा होणार, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 15:00 IST

खुशबूने बेबी बंपसह एक गोड फोटो शेअर करत, ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

ठळक मुद्देएक मोहर अबोल, तु भेटशी नव्याने, पारिजात, तेरे बिन, मेरे साई, आम्ही दोघी अशा मालिकांमध्ये खुशबूने काम केलं आहे.

‘देवयानी’ या मालिकेमुळे संग्राम साळवी (Sangram Salvi) हे नाव घराघरांत पोहोचले आणि एक मोहर अबोल, तु भेटशी नव्याने, पारिजात, तेरे बिन, मेरे साई, आम्ही दोघी अशा मालिकांमुळे खुशबू तावडे (Khushboo Tawade) टीव्हीची स्टार झाली. ख-या आयुष्यात पती-पत्नी असलेलं हे जोडपं म्हणजे, मराठी प्रेक्षकांचं आवडतं जोडपं. आता या जोडप्याच्या घरी लवकरच तिस-या पाहुण्याचं आगमन होणार आहे. होय, खूशबू व संग्राम लवकरच आईबाबा होणार आहेत.

सोशल मीडियावर त्यांनी ही बातमी शेअर केली. खुशबूने बेबी बंपसह एक गोड फोटो शेअर करत, ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. 2018 मध्ये संग्राम आणि खुशबूने विवाह केला होता. 

झक्कास आहे लव्हस्टोरीसंग्राम आणि खुशबू यांच्या मालिकांचे सेट आसपासच होता. त्यामुळे त्या दोघांची तोंडओळख होती पण खुशबूच्या मनात संग्रामबद्दची इमेज काही खास नव्हती. त्याला खूप अ‍ॅटिट्यूड आहे असं खुशबूला वाटायचं. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र एका मालिकेत काम केलं. तेव्हा संग्रामबद्दल खुशबूचं मत बदललं आणि त्यांच्यात मैत्री झाली. मालिकेत  संग्रामसोबत आपलं लग्न झालं नाही तर ती मालिका सोडेल अशी ताकीद खुशबूनं मालिकेच्या निर्मात्यांना दिली होती. कथानकामधील काही बदलामुळे  खुशबूचं लग्न संग्रामशी होऊ शकलं नाही आणि खरंच खुशबूने ती मालिका सोडली. त्याक्षणी संग्रामने ठरवलं की मालिकेत नाही पण खºया आयुष्यात तो खुशबूशीच लग्न करणार आणि त्याने खुशबूला लग्नाची मागणी घातली. संग्राम आणि खुशबूची लव्हस्टोरी देखील त्यांच्यासारखीच अनोखी आणि सुंदर आहे.    

टॅग्स :संग्राम साळवी