Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर संगीता घोषला मिळाली नवी चाहती, जाणून घ्या कोण आहे ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 07:15 IST

अभिनेत्री संगीता घोष सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत पिशाचिनी या खलनायिकेची भूमिकासाकारीत आहे.

नामवंत अभिनेत्री संगीता घोष सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत पिशाचिनी या खलनायिकेची भूमिका साकारीत आहे. आपला अप्रतिम अभिनय आणि शालीन सौंदर्याने लक्षावधी तरुणांच्या काळजाचा एक ठोका चुकविणाऱ्या संगीताचे असंख्य तरूण चाहते आहेत. पण तिच्या चाहत्या तरुणींची संख्याही तितकीच मोठी आहे आणि त्या सर्व तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वावर आणि तिच्या लूकवर फिदा होतात.

या मालिकेत अभिनेत्री पारूल चौधरी उच्चभ्रू अश्लेषा शेरगिलची भूमिका साकारीत असून ती पिशाचिनीला खूप घाबरते, पण वास्तव जीवनात पारुल ही संगीताची प्रचंड मोठी चाहती आहे.

 

तिचे संगीता घोषबरोबर संबंध कसे आहेत, असे विचारल्यावर ती म्हणाली “मी तर तिच्या अभिनयाने पूर्ण भारून गेले आहे. मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेपेक्षा वास्तव जीवनात ती अगदी विरुद्ध असून ती मनाने अगदी सौजन्यशील आणि प्रेमळ आहे. तिचे पाय नेहमीच जमिनीवर असतात.” 

पारूल पुढे सांगते, “संगीता म्हणजे एकदम चैतन्यशील असून ती सेटवर कॅमेर्‍्यासमोर आली की सेट जिवंत होतो. आपल्या कामाबद्दलची तिची कटिबध्दता आमि ती घेत असलेले परिश्रम बघितले की मलाही प्रेरणा मिळते. मी तिचा भरपूर आदर करते आणि मी तिची मोठी चाहतीही आहे.”

दोन अभिनेत्रींमध्ये इतके चांगले नाते निर्माण होताना आणि एकमेकांविषयी इतके चांगले विचार व्यक्त करताना पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. या दोघींमध्ये किती मैत्रीचे संबंध आहेत, ते त्यांच्या या वक्तव्यातून दिसून येते.

टॅग्स :दिव्य दृष्टीसंगीता घोष