Join us
Daily Top 2Weekly Top 5

सना सय्यद म्हणते, हीच गोष्ट आहे माझे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 06:30 IST

स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच 'दिव्य दृष्टी' नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच 'दिव्य दृष्टी' नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत कथा आहे दोन बहिणी दिव्या आणि दृष्टीची, ज्यात एका बहिणीला भविष्य दिसते तर दुसरीमध्ये ते बदलण्याची ताकद आहे. उत्तम कलाकार, छान कथानक आणि पूर्णपणे अनपेक्षित नाट्‌य यांसह ही मालिका प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे.

यात दृष्टीची भूमिका करणारी साना सय्यद खरी एक मार्केटिंग प्रोफेशनल होती आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याबाबत जेव्हा तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, मी मोठी होत असताना मला काय करायचे याबद्दल मला इतके काहीच माहिती नव्हते. मी फक्त प्रवाहासोबत पुढे जात राहिले. अभिनय माझ्यात अगदी सहजपणे आला आणि आता मला तो खूप आवडतो. माझ्या एका सहकाऱ्याने मला सुचवले की मी अभिनय करायला हवा आणि त्यासाठी मग मी ऑडिशन्स दिल्या आणि मग मागे वळून पाहावेच लागले नाही. 

आता अभिनयच माझे आयुष्य असून मी जे का ही करत आहे ते मला मनापासून आवडत आहे. मला सेटवर येऊन काम करण्याची ओढ असते. मला आनंद वाटतो की मला काय करायचे आहे ते अखेर मला कळले आहे. आपली आवड मनापासून पूर्ण करताना आणि केवळ कठोर मेहनतीच्या जोरावर यश मिळवताना एखाद्या व्यक्तीला पाहणे किती समाधानकारक असते, असे सनाने सांगितले. 

टॅग्स :दिव्य दृष्टीस्टार प्लस