Join us

प्रेग्नेंसीमध्ये देखील वर्कआऊट करते समीरा रेड्डी, दुसऱ्यांदा बनणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 15:38 IST

अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नेंसीमध्ये देखील जिममध्ये जाऊन समीरा गाम गाळते आहे.

ठळक मुद्देसमीरा फिटनेस फ्रिक असून ती जिमसोबत योगा करण्यालादेखील प्राधान्य देते

अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नेंसीमध्ये देखील जिममध्ये जाऊन समीरा गाम गाळते आहे. नुकतेच तिला मुंबईतील एका जिममधून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी ती टी-शर्ट व ब्लॅक टाईट जेगिंग्स आऊटफिटमध्ये दिसली. समीरा जुलैमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

समीरा फिटनेस फ्रिक असून ती जिमसोबत योगा करण्यालादेखील प्राधान्य देते.

दुसऱ्यांदा प्रेंग्नेंट असल्याचे खुद्द समीराने सांगितले व पुढे म्हणाली की, हो मी दुसऱ्यांदा प्रेंग्नेंट आहे. माझ्या प्रेग्नेंसीला चार महिने झाले आहेत. सध्या मी कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाही. माझी डिलेवरी जुलैमध्ये होणार आहे.

अभिनेत्री समीरा रेड्डीने व्यावसायिक अक्षय वरडेसोबत लग्न केले असून अक्षयचा मोटरसायकल कस्टमायजेशनचा व्यवसाय आहे. समीराला बाईक चालवण्याचा छंद आहे. ती अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक चालवायची. एक दिवस ती अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

समीराने 25 मे, 2015 साली आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला.

समीरा शेवटची तेज चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, बोमण ईराणी व अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते.

टॅग्स :समीरा रेड्डी