Join us

९० किलो वजन, पोस्टपार्टम डिप्रेशन; समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ, स्वीकारलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:29 IST

समीरा रेड्डीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.

अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. २०१४ साली तिने बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्नगाट बांधली. नंतर तिला दोन मुलंही झाली. या दरम्यान समीरा सोशल मीडियावर व्लॉग्स, रील्स बनवत असते. तिचे सासूसोबतचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. समीरा फिटनेस टीप्सही देताना दिसते. मात्र यावर्षाच्या सुरुवातीलाच समीराचं वजन ९० किलोवर पोहोचलं. म्हणून आता तिने या संपूर्ण वर्षात वजन घटवण्याचं आव्हान घेतलं आहे. याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे.

समीरा रेड्डीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. वजन उचलत आहे, प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. तिचं वाढलेलं वजनही तिने यातून दाखवलं आहे. यावर्षात पुन्हा फिट होण्याचं आव्हान तिने स्वीकारलं आहे. व्हिडिओत तिचा ट्रेनर तिचं माप घेतोय ती म्हणते, "१ जानेवारी २०२५ वर्षाची सुरुवातच माझ्या ९० किलो वजनाने झाली. म्हणून हे वर्ष आता माझं आहे असं मी ठरवलं. मी ४६ वर्षांची आहे आणि माझे सगळे प्रयत्न करुन झालेत. आता मी वजन उचलून पाहणार आहे. योग्य न्यूट्रिशन घेणार आहे, सातत्य ठेवणार आहे आणि थोडं अपयशही सोसणार आहे. तुम्ही सगळे मला साथ द्या कारण हे अजिबातच सोपं नाहीए."

समीराने २०१४ साली मराठमोळा बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्न केलं. २०१५ साली तिने मुलाला जन्म दिला. तर २०१९ साली तिला एक मुलगीही झाली. मुलांच्या जन्मानंतर समीराचं वय कमालीचं वाढलं होतं. १०५ किलोवर गेलं होतं. समीराने पोस्टपार्टम डिप्रेशनचाही सामना केला.  आता या वर्षात तिने पुन्हा फिट होण्याचं आव्हान घेतलं आहे.

टॅग्स :समीरा रेड्डीबॉलिवूडफिटनेस टिप्ससोशल मीडिया