Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मित्रा पश्या, अभिनेता म्हणून तू...', समीर चौघुलेने दिल्या प्रसाद ओकला शुभेच्छा, शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 13:06 IST

प्रसाद एक अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणूनही किती गुणी आहे हे सांगताना समीरने भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आज 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने कलाकार मंडळी, चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. मालिका असो किंवा सिनेमा, अभिनय असो किंवा दिग्दर्शन प्रसादने प्रत्येक भूमिका उत्तम साकारली आहे. फक्त नायकच नाही तर खलनायक म्हणूनही तो समोर आला आहे. या गुणी अभिनेत्याबाबत त्याचा मित्र आणि हास्यजत्रेतील विनोदी अभिनेता समीर चौघुले (Sameer Choughule) भरभरुन बोलला आहे. 

समीर चौघुलेने लाडका मित्र प्रसाद ओकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, 'मित्रा पश्या....खूप खूप प्रेम....अतिशय अफलातून अभिनेता...आमच्या हास्यजत्रेत तो हास्यरसिक म्हणून जे काही बोलतो ते scripted वाटावं इतकं उत्स्फूर्त असत...कमालीचा शब्दसंचय, अफाट वाचन, आणि अत्यंत टोकाची समयसूचकता असल्या शिवाय हे शक्य नाही....अभिनेता म्हणून तू काय आहेस कोण आहेस हे तू नुकतंच धर्मवीर चित्रपटातून अख्या जगाला दाखवून दिलंयस..बहुतेक पुरुषोत्तम, INT आणि सवाई सोडल्यास उत्कृष्ठ अभिनेता या कॅटेगरीतली सगळी पारितोषिक तू गेल्या वर्षी जिंकलीस....चंद्रमुखीसाठी दिग्दर्शक म्हणून तू घेतलेली मेहनत रसिकांनी ही डोक्यावर घेतली...मित्रा तू माझा "जवळचा मित्र" आहेस याचा खूप अभिमान वाटतो..तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही बाप्पा चरणी प्रार्थना....लव्ह यू मित्रा .....

प्रसाद एक अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणूनही किती गुणी आहे हे सांगताना समीरने भावना व्यक्त केल्या आहेत. सुपरहिट 'धर्मवीर' सिनेमाचा पुढचा भाग 'धर्मवीर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघेंची भूमिका साकारणार आहे.धर्मवीर सिनेमात प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेमुळे त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली आणि त्याच्यावर पुरस्करांचा वर्षावही झाला.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासमीर चौगुलेप्रसाद ओक