Join us
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटी उधार घेऊन समांथा रुथ प्रभूनं केले उपचार?, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य; म्हणाली - 'मी आतापर्यंत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 17:52 IST

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. समांथाने काही काळापूर्वी चित्रपटातून ब्रेक घेतला होता. तिने तिच्या आजारावरील उपचारासाठी हा ब्रेक घेतल्याचे वृत्त होते. यानंतर ती तिच्या मेडिटेशन सहलीला निघून गेली. त्यानंतर ती बालीलाही गेली होती आणि तिथले फोटो शेअर करुन चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट दिली होती. दरम्यान, अभिनेत्रीने मायोसिटिस नावाच्या आजारासाठी एका तेलुगू सुपरस्टारकडून २५ कोटी रुपयांची मदत घेतल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये  करण्यात आला. इतकेच नाही तर या ब्रेकमुळे अभिनेत्रीला १२ कोटींचं नुकसान होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. आता या रिपोर्ट्सवर खुद्द अभिनेत्रीचे वक्तव्य समोर आले आहे.

समांथा रुथ प्रभूने उपचारासाठी २५ कोटी रुपयांची मदत एका तेलगू सुपरस्टारने केल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देत मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून समांथा रुथ प्रभूने या वृत्ताला चुकीचं म्हटलं आहे. समांथाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, मायोसिटिस रोगासाठी २५ कोटी? कोणीतरी तुम्हाला खूप चुकीची बाब सांगितली आहे. मला आनंद आहे की मी या रकमेचा फारच छोटा भाग यावर भरत आहे. आणि मला वाटत नाही की मी माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत केलेल्या कामासाठी मला दगड मिळाला आहे. त्यामुळे मी स्वतःची काळजी सहज घेऊ शकते. धन्यवाद. मायोसिटीस हा असा एक आजार आहे. ज्यातून हजारो लोक गेले आहेत. या आजारासंदर्भात दिलेली माहिती शेअर केली आहे, त्यासाठी जबाबदार बना.

वर्कफ्रंटबद्दल... अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अभिनेत्री सध्या सिटाडेलच्या हिंदी आवृत्तीसाठी प्रसिद्धीझोतात आली आहे. या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन 'द फॅमिली मॅन' फेम दिग्दर्शक जोडी राज आणि डीके यांनी केले आहे. यानंतर अभिनेत्री विजय देवरकोंडासोबतच्या कुशी या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच अभिनेत्रीच्या हातात हॉलिवूडचा प्रोजेक्टही आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनी