Join us

समांथाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री? कोट्यधीश दिग्दर्शकासोबत पोहोचली तिरुपती बालाजी मंदिरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 11:23 IST

नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समांथा सिंगल आहे की कुणाला डेट करतेय, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमी पडत असतो.

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीसह तिनं बॉलिवूडमध्येही आपलं नाव गाजवलं आहे. गेले काही दिवस ती तिच्या आजारपणामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नाग चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली. तर दुसरीकडे समांथा मात्र एकटीच होती. मात्र, अशातच आता अभिनेत्री एका लोकप्रिय निर्माता आणि  दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नुकतंच समांथा मिस्ट्री बॉयसोबत तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचली. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. 

समांथानं शनिवारी (१९ एप्रिल) तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत चित्रपट निर्माते राज निदिमोरू होता. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये समांथा आणि राज हे मंदिर परिसरात पारंपारिक पोशाखात दिसून आले. समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांच्यात गेल्या काही काळापासून डेटिंगच्या अफवा पसरत आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही या अफवांना दुजोरा किंवा नाकारलं नाही. विशेष म्हणजे समांथाच्या आयुष्यात एखादा साथिदार असावा अशी तिच्या चाहत्यांचीही इच्छा आहे.

नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती.  समांथाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच 'रक्त ब्रह्मांड'मध्ये पाहायला मिळणार आहे.  या सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूर आणि वामिका गब्बी देखील दिसणार आहेत. याआधी समांथा 'सिटाडेल हनी बनी'मध्ये पाहायला मिळाली होती. ही वेब सीरिज राज यांनी दिग्दर्शित केली होती आणि समंथा मुख्य भूमिकेत होती. या सीरिजच्या शूटिंगपासून समंथा आणि राज यांच्यात डेटिंगच्या अफवा पसरत आहेत.  

टॅग्स :समांथा अक्कीनेनीतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट