Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सिटाडेल: हनी बनी' सीरीजने वरुण अन् समांथाला केलं मालामाल, किती घेतलं मानधन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:04 IST

 'सिटाडेल : हनी बनी'साठी वरुण धवनने सर्वाधिक मानधन घेतल्याची माहिती आहे.

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Rurh Prabhu) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांची 'सिटाडेल : हनी बनी' ही सीरीज  Amazon Prime Video रिलीज झाली आहे. राज आणि डीके दिग्दर्शित स्पाय-थ्रिलर प्रेक्षकांच्या पसंतीसही उरतली.  ४० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सीरीजमधील कलाकारांनी किती मानधन घेतलं, हे आपण जाणून घेऊया. 

 'सिटाडेल : हनी बनी'साठी वरुण धवनने सर्वाधिक फी आकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, वरुणने या सीरिजसाठी 20 कोटींची मोठी रक्कम घेतली आहे. तर आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या समांथा हिने 10 कोटी रुपये फी आकारली आहे. यात अभिनेता आणि अभिनेत्रींच्या मानधनात खूप मोठी तफावत दिसून आली. 

वरुण आणि समांथा यांच्याशिवाय सीरीजमध्ये अभिनेते केके मेनन, साकिब सलीम आणि सिकंदर खेर यांच्याही भुमिका आहेत. केके मेनन एक अप्रतिम अभिनेता आहेत. या सीरीजसाठी केके मेनन यांनी दीड कोटी रुपये, तर साकिब सलीमने  40 लाख रुपये घेतले आहेत. याशिवाय, सिकंदर खेरला  50 लाख रुपये मानधन मिळालं आहे.

समांथाची 'सिटाडेल : हनी बनी' ही ॲक्शन थ्रिलर वेब सिरीज आहे. 7 नोव्हेंबर रोजी 'सिटाडेल'चा प्राईम व्हिडिओवर प्रीमियर झाला आहे.  'सिटाडेल : हनी बनी' ही प्रियंका चोप्राच्या 'सिटाडेल'ची प्रीक्वल आहे, प्रियांकाच्या नादियाच्या पात्राचे बालपण यात दाखवण्यात आले आहे. या सीरिजचे एकूण 6 भाग आहेत. प्रत्येक भाग 40 ते 50 मिनिटांचा आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीवरूण धवन