Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या समांथाचा माकडाशी झाला सामना, अभिनेत्रीचा लंपास केला गॉगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:07 IST

समंथा बालीमधील तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. पण यादरम्यान तिने एक गमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. 

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभूने सध्या कामातून ब्रेक घेतला. तिची मैत्रिण अनुषा स्वामीसोबत बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. अलीकडेच, समंथाचा एक फोटो देखील समोर आला होता ज्यात ती ध्यान करताना दिसली होती. अभिनेत्रीने नवीन हेअरकट देखील केला आहे. समंथा बालीमधील तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. पण यादरम्यान तिने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. 

बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेलेल्या समंथाला माकडांच्या टोळीचा सामना करावा लागतो. यातील एक माकड अतिशय हुशार निघाले. तो आधी अभिनेत्रीच्या जवळ आला आणि नंतर तिचा गॉगल घेऊन निघून गेला

 समंथा अनुषासोबत बालीमधील उलुवाटूला भेट देण्यासाठी गेली. या दोघांनी या रोड ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समंथा ऑलिव्ह ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर गॉगल दिसत आहे. समंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

तिच्या इन्स्टा स्टोरीवरील व्हिडिओ क्लिपमध्ये समंथाने वाहणाऱ्या पाण्याची झलक दिली आहे. समंथाने पुढे सांगितले की कसे एक माकड तिचा काळा गॉगल घेऊन पळून गेला. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती अनुषासोबत पोझ देत आहे, तर मागून एक माकड डोकावताना दिसत आहे. 

दरम्यान,  समंथाने साऊथसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. गेल्या काही काळापासून समंथाची प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने काही काळासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. समंथा लवकरच अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत 'खुशी' या सिनेमात झळकणार आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनी