Join us
Daily Top 2Weekly Top 5

Samantha : "ते ६ महिने अत्यंत वेदनादायी...", समंथाची पोस्ट वाचून चाहते पडले चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:22 IST

अभिनेत्रीने अशी एका पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा काळजी वाटू लागली आहे.

साउथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu)ने नुकताच असा निर्णय घेतला ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. समांथा अभिनयातून  ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. एवढेच नाही तर तिने अनेक निर्मात्यांचे पैसेही परत केले आहेत. तिच्या या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने अशी एका पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. या पोस्टमध्ये तिने गेल्या सहा महिन्यांचा 'सर्वात कठीण' असे वर्णन केले आहे. 

समंथाने तिचा एक सेल्फी शेअर केला आणि इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले,''काही महिन्यांपासून खूप कठीण काळातुन जावं लागतंय. सर्वात लांब आणि सर्वात वेदनादायी सहा महिने आहेत.'' ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते प्रचंड काळजीत पडले आहेत. गेल्या सहा महिन्या दरम्यान तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत, असा अंदाज लोक बांधत आहेत. त्याचबरोबर ती एका गंभीर आजाराशीही झुंज देत आहे. आता या पोस्ट करण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे फक्त अभिनेत्रीच सांगू शकते.

2022 वर्षाच्या अखेरीस समंथाने पोस्ट शेअर करत तिच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. मायोसायटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ती त्रस्त आहे. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरु आहेत. अशातच आता तब्येतीकडे लक्ष द्यायचं या कारणाने ती काही काळ कामातून ब्रेक घेत आहे. किमान एक वर्ष तरी समंथा मोठ्या पडद्यावर दिसणार नाही. 2022 वर्षाच्या अखेरीस समंथाने पोस्ट शेअर करत तिच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. मायोसायटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ती त्रस्त आहे. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

समंथा रुथ प्रभू 'शाकुंतलम' सिनेमातही दिसली. तर लवकरच तिची 'सिटाडेल' ही सिरीज रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. तर तिचा आणि विजय देवरकोंडाचा 'खुशी' सिनेमाही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. समंथाचं वैयक्तिक आयुष्यही मध्यंतरी चर्चेत होतं. आधी अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न आणि काही वर्षातच घटस्फोटामुळे दोघंही चर्चेत आले होते.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी