साउथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) काही दिवसांपासून मायोसिटिस नावाच्या आजाराने त्रस्त होती, त्यामुळे ती एक वर्षापासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर होती. शेवटची ती प्राइम व्हिडिओच्या 'सिटाडेल: हनी बनी' या सीरिजमध्ये पाहायला मिळाली. या सीरिजचे दिग्दर्शन राज डीकेने केले आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने चित्रपटात पुनरागमन करतानाचा तिचा अनुभव शेअर केला आहे. तसेच तिने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलही खुलासा केला आहे.
समांथा रुथ प्रभूने नुकतेच न्यूज २४ शी बोलताना तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले. तिने सांगितले की ती लवकरच 'बंगाराम' चित्रपटातून निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. याशिवाय ती तिची मोस्ट अवेटेड वेब सीरिज 'रक्त ब्रह्मांड'चीदेखील निर्मिती करणार आहे. ही सीरिज अजून निर्मितीच्या टप्प्यात सुरू आहे.
कोण आहे समांथाचे पहिले प्रेम?समांथा रुथ प्रभूनेही या मुलाखतीत तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, 'रक्त ब्रह्मांड मला लवकरच संपवायचे आहे आणि पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या इतर चित्रपटांचे काम पूर्ण करायचे आहे. एक-दोन महिन्यांत बरेच काम पूर्ण करायचे आहे.' ती पुढे म्हणाली की, 'मला वाटते की माझे चित्रपटांपासूनचे अंतर आता संपले आहे. हे माझे पहिले प्रेम आहे.
लव्ह लाईफवर म्हणाली...समांथा रुथ प्रभूने मुलाखतीत तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितले. ती म्हणाली की, 'समांथा सिंगल आहे. मला वाटत नाही की मी माझ्या लव्ह लाईफबद्दल पुन्हा कोणाशीही बोलेन. हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, तो खूप खाजगी ठेवण्याचा मी विचार केला आहे. मी त्यावर पुन्हा बोलणार नाही.