Join us
Daily Top 2Weekly Top 5

समांथा अक्किनेनी मुंबईत होतेय कायमची शिफ्ट?, अभिनेत्रीने लाइव्हवर याबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 19:10 IST

समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, नागा समांथापासून वेगळी झाली आहे आणि ती तिच्या वडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे. असेदेखील सांगितले जात आहे की ती तिच्या करिअरवर फोकस करण्यासाठी मुंबईत शिफ्ट होऊ शकते. दरम्यान आता तिने लाइव्ह येऊन चाहत्यांसोबत संवाद साधला आणि मुंबईत येण्याबाबतचा खुलासा केला आहे.

समांथा अक्किनेनीने इंस्टाग्रामवर लाइव्ह येऊन चाहत्यांशी बातचीत केली आणि तिच्या प्रश्नांची उत्तरेदेखील दिली. या चॅट सेशन दरम्यान अभिनेत्रीला चाहत्यांना प्रश्न विचारला की, खरंच तुम्ही मुंबईला शिफ्ट होणार आहात का?, त्यावर समांथाने कोणतेही आडेवेडे न घेता युजर्सच्या प्रश्नांचे उत्तर दिले आणि म्हटले की, मला माहित नाही माझ्याबद्दल इतक्या अफवांना कशी सुरूवात झाली आणि पसरली. शंभर प्रकारच्या अफवा आहेत, ज्या खऱ्या नाहीत. हैदराबादमध्ये माझे घर आहे आणि तेच माझे घर राहणार आहे. हैदराबादने मला सर्व काही दिले आहे. मी इथेच आनंदाने पुढेही राहणार आहे. समांथाच्या उत्तराने स्पष्ट झाले की, ती मुंबईला शिफ्ट होत नाही आहे.

समांथा आणि नागा चैतन्यच्या नात्याबद्दल सांगायचे तर दोघांनी २०१७मध्ये गोव्यात ग्रॅण्ड डेस्टिनेशन वेडिंग केले होते. आता लग्नाच्या ४ वर्षानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या नात्यात कटुता आल्याची बाब समोर आल्यानंतर जेव्हा अभिनेत्री इंस्टाग्रामवरून नवऱ्याचे आडनाव हटवून फक्त एस केले होते. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या आणि विभक्त होत असल्याच्या चर्चा केल्या. मात्र याबाबत अद्याप दोघांनी खुलासा केला नाही. 

द फॅमिली मॅन २ फेम राजी म्हणजेच अभिनेत्री समांथाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती शाकुंतलममध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुना शेखरने केले आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी