Join us

सलमानचा जावई आयुष शर्मा घेतोय मराठीचे धडे, 'या' मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 21:00 IST

आगामी काळात प्रविण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचाही हिंदी रिमेक बनवण्यात येणार आहे. या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी आयुषने खास मराठीचे धडे गिरवण्यास सुरुवातही केली आहे.

बॉलीवूडच्या मंडळींचं मराठी प्रेम काही लपून राहिलेलं नाही. मराठी सिनेमाची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून बॉलीवूडकर चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मराठी सिनेमात काम करण्यासाठी आतुर असतात. याशिवाय अनेक प्रसिद्ध आणि गाजलेल्या मराठी सिनेमांचे आता हिंदीतही रिमेक बनू लागले आहेत. आतापर्यंत सलमान आमीर यांचं मराठी प्रेम तर जगजाहीर झालंय. बॉलीवूडच्या या मंडळींपैकी एक प्रसिद्ध आणि गाजलेलं नाव म्हणजे आयुष शर्मा. यालाही आता मराठी प्रेमाचं भरतं आलं आहे. सलमानची बहिण अर्पिता खानचा पती आयुष शर्माने 'लव्हयात्री' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. आता आयुषला दुसरा सिनेमा मिळाला आहे. सध्या तो या सिनेमासाठी जोरदार तयारी करत आहे. आयुषही आता सलमानच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत रूळण्याचा प्रयत्न करतोय. 

आगामी काळात प्रविण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचाही हिंदी रिमेक बनवण्यात येणार आहे. या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी आयुषने खास मराठीचे धडे गिरवण्यास सुरुवातही केली आहे. मराठी भाषा अवगत व्हावी म्हणून त्याने अनेक व्हिडिओही पाहिले आहेत. काही मराठी पुस्तकं वाचण्याचाही तो प्रयत्न करत असल्याचे आयुषने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर जास्तीत जास्त तो मराठी भाषेतूनच संवाद साधण्याचाही प्रयत्न करतो. बॉलीवुडच्या स्टार्सने मराठी भूमिका साकारणे किंवा त्यांना मराठीचं भरतं येणं हे काही नवं नाही. त्यामुळे या यादीत आता आयुषचेही नाव सामिल होणार हे मात्र नक्की.

टॅग्स :सलमान खानअर्पिता खान