Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानची बहिण अर्पिता आणि जीजा आयुष शर्माचे 'कोरोना' रिपोर्ट आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 17:42 IST

सलमान खानची बहिण अर्पिता आणि जीजा आयुष शर्मा आपल्या कुटुंबासोबत सध्या मंडी येथे आहेत. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता व तिचा नवरा आयुष शर्माआणि त्यांच्या दोन मुलांसहित कुटुंबातील 10 लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने कोरोना टेस्टसाठी सॅम्पल घेतले होते. आता त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आला असून कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.मंडीचे सीएमओ डॉ. देवेंद्र शर्मा यांनी सांगितले की, अर्पिता-आयुष, मुले आणि नोकरांसह 10 लोकांचे सॅम्पल घेण्यात आले होते. या सगळ्यांचे रिपोर्ट आता निगेटीव्ह आले आहेत.

अर्पिता आणि आयुष दोन मुलांसह 15 जून रोजी मुंबईहून हॅलिकॉप्टरनं मंडीला गेले होते. मुले लहान असल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आयुष त्याच्या कुटुंबासह वडील आणि आमदार अनिल शर्मा यांच्या नव्या घरात क्वारंटाईन आहेत. या सगळ्यानंतर सोशल मीडियावर असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर प्रशासनाने असे स्पष्टीकरण दिले की, त्यांच्यासोबत लहान लहान मुले असल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मंडीमध्ये कोरोनाची एकूण 24 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 21 रुग्ण बरे झाले आहेत.

दोन लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1 पॉझिटिव्ह केस आहे.

टॅग्स :सलमान खानअर्पिता खानआयुष शर्माकोरोना वायरस बातम्या