Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या लाडक्या बहिणींना कोरोनाची लागण, अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 21:38 IST

सलमान खानची बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मालादेखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मालादेखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. ही माहिती खुद्द एका सलमान खानने दिली आहे. सलमान खानचा राधे चित्रपट लवकरच  ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

सलमान खानने कोरोनाच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, आधी लांबच्या लोकांना कोरोना झाल्याची बातमी ऐकत होतो आणि मागील वर्षी माझ्या ड्रायव्हरला कोरोना झाला होता. तो पुढे म्हणाला की, कोरोनाची दुसरी लाट खूपच भयानक आहे आणि कोरोना जसा प्रत्येक घरात घुसला आहे.

सलमान खानने सांगितले की त्याच्या दोन्ही बहिणी अलवीरा आणि अर्पिता यावेळी कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. एका मुलाखतीत सलमान खानला विचारले होते की, कोरोनाच्या बाबतीत काळजी घेताना दिसत नाही. त्यांना काय सांगशील. त्यावर सलमान खानने त्याच्या बहिणींबद्दल सांगितले.

सलमान खानची बहिण ३१ वर्षाच्या अर्पिता खानने २०१४ साली आयुष शर्मासोबत लग्न केले. कॉश्च्युम डिझायनर असलेली ५१ वर्षीय अलवीराने अभिनेता अतुल अग्निहोत्री १९९६ साली लग्न केले होते.

सलमानचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट देखील याच कथेवर आधारित असून सलमान गँगस्टर, रणदीप प्रॉसिक्यूटर आणि दिशा सुंदर मुलीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.हा चित्रपट बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच १३ मे ला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सलमान खानकोरोना वायरस बातम्याअर्पिता खान