Join us

सलमानची एक्स वहिनी पुन्हा प्रेमात, सोहेलसोबत विभक्त झाल्यानंतर या व्यक्तीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:15 IST

Seema Sajdeh : सोहेल खानसोबत विभक्त झाल्यानंतर सीमा सजदेहच्या जीवनात एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. याबद्दल खुद्द स्वतः सीमा सजदहने खुलासा केला आहे.

सोहेल खान(Sohail Khan)सोबत विभक्त झाल्यानंतर सीमा सजदेह(Seema Sajdeh)च्या जीवनात एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. याबद्दल खुद्द स्वतः सीमा सजदहने खुलासा केला आहे. ती नुकतीच फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स (Fabulous Lives of Bollywood Wives) शोमध्ये पाहायला मिळाली. या शोमध्ये तिने लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर आयुष्यात ती पुढे कशी गेली, यावर भाष्य केले. फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्समध्ये महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी पाहायला मिळाली. या शोदरम्यान आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत.

सीमा सजदेहने फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स शोच्या तिसऱ्या सीझनच्या फायनल एपिसोडमध्ये सांगितले की, ती जीवनात पुढे गेली आहे आणि विक्रम आहुजा नामक व्यक्तीला डेट करत आहेत. सीमाने विक्रमबद्दल तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनाही सांगितलं आहे आणि त्यांना भेटवलेदेखील आहे. तिने सांगितले की, सोहेल खानसोबत लग्न करण्यापूर्वी तिने विक्रमसोबत साखरपुडा केला आहे. मात्र नंतर तिचे सोहेलवर प्रेम जडले आणि तिने लग्न केले. 

२४ वर्षांनी झाले विभक्तसोहेल आणि सीमा सजदेहचे नाते जवळपास २४ वर्षांपर्यंत टिकले. दोघांनी १९९८ साली लग्न केले होते. दोघांना प्रेम झाले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यावेळी दोघे वयाने खूप लहान होते. २०२२ साली सोहेल आणि सीमाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोघे एक वर्षांपासून वेगळेच राहत होते.

सीमा-सोहेलला आहेत दोन मुलंसीमा आणि सोहेल यांना दोन मुले आहेत, योहान आणि निरवान. दोघांचे नाते संपले असले तरी सीमा आणि सोहेल दोघेही दोन्ही मुलांची काळजी घेतात. निरवान २३ वर्षांचा आहे तर योहान त्याच्यापेक्षा छोटा आहे.  

टॅग्स :सोहेल खान