Join us

VIDEO: सलमान खानची बहीण अर्पिता जेव्हा दुबईच्या रेस्टॉरन्टमध्ये तोडत होती प्लेट्स....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 10:11 IST

अशाप्रकारे प्लेट्स तोडणं शुभ मानलं जातं ऐनशिएंट ग्रीक कल्चरनुसार प्लेट्स तोडणं एक ट्रेडिशन आहे आणि अनेक रेस्टॉरन्टमध्ये असं हे ट्रेडिशन फॉलो केलं जातं.

अर्पिता खान सलमान खानची लाडकी बहीण आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहते. आता तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती दुबईच्या एका रेस्टॉरन्टमध्ये प्लेट्स तोडताना दिसत आहे अर्पितासोबत तिच्या मैत्रीणीही आहेत. या व्हिडीओतील सगळेच लोक या अ‍ॅक्टिविटीचा आनंद घेत आहेत.

एका ग्रीक परंपरेनुसार, अशाप्रकारे प्लेट्स तोडणं शुभ मानलं जातं ऐनशिएंट ग्रीक कल्चरनुसार प्लेट्स तोडणं एक ट्रेडिशन आहे आणि अनेक रेस्टॉरन्टमध्ये असं हे ट्रेडिशन फॉलो केलं जातं. असं मानलं जातं की, असं करून नकारात्मकता दूर केली जाते आणि समृद्धी येते. सलमान खानची बहीण अर्पितानेही हे ट्रेडिशन ट्राय केलं.

अर्पिताचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. यात ती दुबई ट्रिप दरम्यान एका हॉटेलमध्ये प्लेट्स तोडताना दिसत आहे. ती तिच्या मैत्रीणींसोबत एका हॉटेलमध्ये बसली आहे आणि टेबलवरील प्लेट्स फेकत आहे. व्हिडीओच्या दुसऱ्या भागात तिच्यासोबत इतरही पाहुणे प्लेट्स तोडताना दिसत आहेत.

नुकतीच अर्पिता खानने आपल्या एनिव्हर्सरीवर पती आयुष शर्मासाठी पोस्ट लिहिली होती. यावेळी आयुष सोबत नव्हता. तिच्या लग्नाला आता ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्पिताला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. या डिसेंबरला तिची मुलगी एक वर्षांची होईल. 

टॅग्स :अर्पिता खानसोशल व्हायरलबॉलिवूडदुबई