Join us

सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 14:00 IST

सलमान खानच्या सिकंदरमध्ये सध्या गाजलेल्या मुंज्यामधील हा अभिनेता व्हिलनच्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे (salman khan, sikandar)

सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. भाईजानचे याआधीचे 'टायगर ३' आणि 'किसी का भाई किसी की जान' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर इतके कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे स्वतः सलमान आणि त्याच्या चाहत्यांना 'सिकंदर' सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. 'मुंज्या'मध्ये कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते सत्यराज सलमानच्या 'सिकंदर'मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

सिकंदरमध्ये खलनायक होणार बाहुबलीचा कटप्पा

 'बाहुबली' फ्रँचायझीमधील कट्टप्पाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते सत्यराज 'सिकंदर'मध्ये काम करणार आहेत. अलीकडेच सत्यराज यांनी 'मुंज्या' सिनेमात डॉक्टरची भूमिका साकारुन सर्वांना खळखळून हसवलं. सत्यराज यांच्यासोबतच अभिनेता प्रतीक बब्बरनेही सिकंदर सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमान खानसोबत सत्यराज भिडणार असून ते या सिनेमात मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.  प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर अधिकृत फोटो शेअर करत ही मोठी बातमी जाहीर केली आहे.

या दिवशी प्रदर्शित होणार 'सिकंदर'

साजिद नाडियादवाला निर्मित 'सिकंदर'चे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करत आहेत. या सिनेमात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. हा ॲक्शन एंटरटेनर सिनेमा ईद २०२५ वीकेंड दरम्यान रिलीज होईल. हा सिनेमा यापूर्वी कधीही न अनुभवलेला सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देणार आहे. या सिनेमाबद्दल सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अशातच काल एक अपडेट आली होती ती म्हणजे सलमान खान 'सिकंदर'च्या भूमिकेत वरुण धवनच्या 'बेबी जॉन'मध्येही कॅमिओत दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खानबाहुबलीप्रतीक बब्बरसाजिद नाडियाडवाला