Join us

फोटोत सलमानचं बोट चावणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?, आता आहे प्रसिद्ध अभिनेत्याची आहे पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:26 IST

सलमान खानसोबत व्हाईट कलरचा फ्रॉक घालून सोफ्यावर बसलेल्या या मुलीला तुम्ही ओळखलंत का?.

सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटी 2 सध्या धुमाकूळ घालत आहे. सलमान खानच्या चित्रपटांपेक्षा या शोचीच जास्त चर्चा आहे. सलमान खानच्या शोमधून दररोज काहीतरी ना काही समोर येत आहे. पण दरम्यान, सलमान खान त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत  आला आहे. सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक छोट्या मुलीसोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. जाणून घेऊया सलमानसोबत फोटोत दिसणारी ही चिमुकली कोण आहे ती.

सलमान खानचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे हे सगळ्यांचं माहिती आहे.  विशेषत: सलमान त्याची बहीण अर्पिताच्या खूप जवळ आहे आणि दोघांचे एकमेकांशी चांगलं बॉन्डिंग आहे. आज भाईजानची बहीण अर्पिता खान शर्माचा वाढदिवस आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी, सलमानेन एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो पाहून तुम्हीही म्हणाल कुणाची नजर नको लागो देत या बहीण-भावाच्या जोडीला.  

सलमान खान त्याची बहीण अर्पिता खान शर्मावर किती प्रेम करतो हे जगजाहीर आहे. हा फोटो शेअर करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे अर्पिता'. यासोबतच त्याने रेड हार्ट आणि इमोजीही  पोस्ट केलं आहे. सलमनाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत अर्पिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटोत सोफ्यावर बसलली अर्पिता सलमान खानचं बोट चावताना दिसतेय. फोटोत अर्पिताने व्हाईट कलरचा फ्रॉक घातलेला दिसतोय. सलमान खानही या फोटोत खूप तरुण दिसतोय. भावा-बहिणीच्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष देखील वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.  

टॅग्स :सलमान खानअर्पिता खान