Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या 'सिकंदर'चं 'नो प्रमोशन'! मोठं कारण आलं समोर; ट्रेलर लाँचही झाला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 09:15 IST

रिलीज डेट तोंडावर असताना ना ट्रेलर आला आणि ना ही सिनेमाचं प्रमोशन होत आहे.

अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) सिनेमा जेव्हा जेव्हा ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला आहे तेव्हा तो सुपरहिट झाला आहे. भाईजानचा या ईदला 'सिकंदर' सिनेमा रिलीज होत आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे. ३० मार्च रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमाचा अद्याप ट्रेलरही आलेला नाही. त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची वेळ येते की काय अशी चर्चा आहे. त्यातच सलमान सिनेमाचं प्रमोशनही करताना दिसत नाहीए.  आता यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.

भाईजानच्या 'सिकंदर'चा सध्या केवळ टीझर आला आहे. तसंच यातील दोन गाणीही रिलीज झाले आहेत. सलमान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री यातून पाहायला मिळत आहे. सिनेमा रिलीजला केवळ ८ दिवस बाकी असतानाच ना ट्रेलर आणि ना ही सिनेमाचं प्रमोशन होत आहे. सलमान आणि रश्मिका प्रमोशनसाठी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अद्याप आलेले नाहीत. एवढ्या बिग बजेट सिनेमाचं साधं प्रमोशनही का होत नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यामागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे सलमानची सुरक्षा. पिंकव्हिला रिपोर्टनुसार, सलमानला गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. कडक सुरक्षा असल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत जाण्यासाठी त्याच्यावर अनेक निर्बंध आहेत. याचमुळे सिकंदरचं प्रमोशनही मर्यादितच होणार आहे.

'सिकंदर'चा ट्रेलर २३ किंवा २४ मार्च रोजी येऊ शकतो. ३० हजार लोकांच्या उपस्थितीत भव्य ट्रेलर लाँचचं आयोजन होणार होतं. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तेही रद्द करण्यात आलं आहे.

सिनेमाचं नक्की किती काम बाकी आहे? 

मिड डेच्या रिपोर्टनुसार, 'सिकंदर' च्या शूटिंगचं सध्या पॅच वर्क सुरु आहे. त्यामुळे मेकर्सवर सिनेमाच्या ट्रेलर आणि रिलीजचा दबाव वाढत चालला आहे. इतकंच नाही तर आताच वीकेंडला सिनेमाचे दोन सीन्स शूट झाले आहेत असा खुलासा क्रू मेंबरने केला. त्यामुळे सिनेमाच्या एडिटिंगचं काम बाकी आहे. क्रू मेंबरच्या माहितीनुसार, "शनिवारी मुंबईतील विले पार्लेतील गोल्डन टोबॅको फॅक्टरीमध्ये ५० लोकांसोबत एक छोटा अॅक्शन सीक्वेन्स शूट केला गेला. पुढच्या दिवशी गोरेगांव येथील फिल्मालय स्टुडिओमध्येही छोटा सीन शूट झाला. हा ट्रेलरमध्येही पाहायला मिळेल. त्यामुळे आता त्याच्या ए़डिटिंगचं काम सुरु आहे. सिनेमाच्या पॅचवर्कचं शूटिंग तासभर चाललं जो अतिशय महत्वाचा आहे."

ट्रेलर रिलीज न करणं मेकर्सची स्ट्रॅटेजी?

सिनेमाच्या टीझरनंतर ट्रेलर आणि गाणी एकामागोमाग रिलीज होतात. मात्र 'सिकंदर'च्या ट्रेलरचे काहीच चिन्ह दिसत नाहीत. ए आर मुरुगदास हे सिनेमात अतिशय बारीकसारीक गोष्टींवर लक्ष देतात. त्यामुळे सध्या पोस्ट प्रोडक्शन टीम दिवरात्र मेहनत घेत आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमा