Join us

‘सुल्तान’चा दिग्दर्शक अली अब्बास जफरने गुपचूप केले लग्न, शेअर केला सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 13:48 IST

कतरिना ते सुनील ग्रोव्हर सर्वांनी दिल्या शुभेच्छा

ठळक मुद्देसलमानसोबत अली अब्बासने अनेक सिनेमे केले आहेत. याशिवाय मेरे ब्रदर की दुल्हन आणि गुंडे हे सिनेमेही त्याने दिग्दर्शित केले.

सुल्तान, टायगर जिंदा है, भारत सारखे सुपरहिट सिनेमे बनवणारा दिग्दर्शक व सलमान खानचा जिगरी यार अली अब्बास जफर नुकताच लग्नबंधनात अडकला. अली अब्बासने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिली आहे.इन्स्टाग्रामवर त्याने लग्नाचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोत अलीच्या पत्नीचा चेहरा दिसत नाही. फोटोत या नवविवाहित जोडप्याने एकमेकांचा हात पकडला आहे. हा फोटो शेअर करताना ‘बिस्मिल्लाह’ असे कॅप्शन त्याने दिले आहे. अलीने कोणाशी लग्न केले, ती कोण, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. मात्र लग्नाची बातमी शेअर करताच अलीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. कतरिना कैफपासून सुनील ग्रोव्हरपर्यंत सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अली अब्बास हा सलमानचा जिगरी यार म्हणून ओळखला जातो. कतरिनाचाही तो जवळचा मित्र आहे. होय,कॅट अली अब्बासची चांगली मैत्रीण आहे. म्हणूनच तर जेव्हा प्रियंका चोप्राने  ‘भारत’ या सिनेमातून अचानक काढता पाय घेतला तेव्हा अली अब्बास थेट कतरिनाकडे गेला होता. प्रियंकाच्या जागी या सिनेमात ऐनवेळी कॅटची वर्णी लागली होती. 

सलमानसोबत अली अब्बासने अनेक सिनेमे केले आहेत. याशिवाय मेरे ब्रदर की दुल्हन आणि गुंडे हे सिनेमेही त्याने दिग्दर्शित केले. अलीकडे रिलीज झालेल्या ‘खालीपीली’ या सिनेमाचा सहनिर्माता म्हणून त्याने काम केले आहे. अली लवकरच ओटीटीवर डेब्यू करणार आहे. ओटीटीवर लवकरच त्याची एक सिनेमा रिलीज होतोय. यात सैफ अली खान, डिम्पल कपाडिया व सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिका आहेत.

टॅग्स :अली अब्बास जाफर