Join us

सलमानचा तुरुंगातील पहिला फोटो समोर, सोशल मीडियातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 17:49 IST

आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

जोधपुर : अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकारप्रकरणी जोधपुर कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. त्या तुरुंगातील त्याचा पहिला फोटो समोर आलाय. 

या फोटोत सलमान खान हा पोलीस अधिका-यांसमोर आरामात खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियातून टीकाही होत आहे. सर्वसामान्य गुन्हेगारांना अशी वागणूक दिली जाते का असा प्रश्नही विचारला जात आहे.

सलमानला तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली असती, तर त्याला जोधपूर कोर्टातच जामीन मिळू शकला असता आणि कदाचित त्याला तुरुंगात जावं लागलं नसतं. परंतु, गुन्ह्याचं स्वरूप, सगळे पुरावे आणि बिष्णोई समाजाच्या भावना लक्षात घेऊन जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता जामिनासाठी त्याला वरच्या कोर्टात जावं लागणार आहे आणि त्यात काही कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे किमान आजची रात्र तरी सलमानचा जेलमध्येच काढावी लागेल. 

टॅग्स :काळवीट शिकार प्रकरण