Join us  

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा अभिनेत्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "कतरिनाने मला फोन करुन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 4:55 PM

सोमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्याबद्दल खुलासे केले आहेत.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधील करिअरबरोबरच सलमानच्या अफेअर्सचीही बरीच चर्चा रंगली होती. अनेक अभिनेत्रींबरोबर सलमान खानचं नाव जोडलं गेलं होतं. त्यातीलच एक म्हणजे सोमी अली. सलमान खान काही काळ सोमी अलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. सोमी अलीने सलमान खानवर पुन्हा आरोप केले आहेत. 

सोमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्याबद्दल खुलासे केले आहेत. "सलमान खान तू माझं सगळं काही हिरावून घेतलंस. तू तुझ्या वडिलांसारखाच आहेस. त्यांनी कित्येक वर्ष तुझ्या आईचं शोषण केलं आणि तू नुसता बघत राहिलास. एका मुलाचं कर्तव्य म्हणून तू तुझ्या आईची मदत केली नाहीस. आणि तुझ्या वडिलांनाच तू आदर्श मानलंस," असं सोमीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सलमान खानचं नाव बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफबरोबरही जोडलं गेलं होतं. सोमीने या पोस्टमध्ये कतरिना कैफबद्दल खुलासा केला आहे. "तू तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंडला मारहाण केलीस. मला एकदा कतरिना कैफने फोन केला होता. मी या सगळ्या गोष्टी माझ्या आत्मचरित्रातही मी लिहणार आहे. तुझी वेळ आता संपत आली आहे," असंही पुढे सोमीने म्हटलं आहे.  सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचं लग्न सोमी अलीमुळे तुटलं होतं. सलमान आणि मला रंगेहाथ पकडल्याचा खुलासाही सोमीने एका मुलाखतीत केला होता. 

टॅग्स :सलमान खानसोमी अलीसेलिब्रिटी