बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्याच्या ट्विटरवरील फॉलोवर्सने चार कोटींचा आकडा पार केला आहे. 4 कोटी फॉलोवर्स असणारा दुसरा लोकप्रिय अभिनेता बनला आहे. नंबर वनवर अमिताभ बच्चन आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी शाहरुखनेचे सुद्धा 4 कोटी फॉलोवर्स ट्विटवर झाले होते मात्र काही दिवसांनी त्याचे फॉलोवर्स कमी झाले.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}
सलमानचे फॅन्सचे सध्या त्याचे अभिनंदन करतायेत. सलमानचे फॅन्स फक्त ट्विटरवरच नाही तर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरसुद्धा त्याचे अभिनंदन करतायेत. सलमान काही दिवसांपूर्वीच युट्यूबदेखील आला आहे. तीन दिवसांत सलमानचे युट्यूबवर अनेक हजार फॉलोवर्स झाले आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सलमान सध्या 'राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याच्या या सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. या सिनेमात सलमानसोबत दिशा पटानी दिसणार आहे. प्रभूदेव या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. सिनेमात सलमान एका हटके भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. यात अभिनेता जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.