सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे. पण भाईजानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तरी या चित्रपटाचे शूटींग थांबले आहे. म्हणजेच, दिग्दर्शक अली अब्बास जफर याने चित्रपटाचे शूटींग थांबवले आहे. भाईजान व अली अब्बासच्या मतभेदांमुळे वा भांडणामुळे शूटींग थांबले, असा विचार तुम्ही करत असाल तर ते चूक आहे. होय, शूटींग थांबवण्यात आलेय, हे खरे आहे. पण मतभेदामुळे वा भांडणामुळे नाही तर भाईजानच्या वाढदिवसामुळे. होय, येत्या २७ तारखेला भाईजानचा बर्थडे आहे. आता भाईजानचा बर्थ डे असताना कोण काम करणार? खुद्द अली अब्बासने याचा खुलासा केला आहे.
अली अब्बासने थांबवले ‘भारत’चे शूटींग! ‘भाईजान’आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 15:40 IST
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे. पण भाईजानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तरी या चित्रपटाचे शूटींग थांबले आहे.
अली अब्बासने थांबवले ‘भारत’चे शूटींग! ‘भाईजान’आहे कारण!
ठळक मुद्देअली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटासाठी सध्या सलमान खान प्रचंड मेहनत घेतोय. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिस