Join us

वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 10:19 IST

सलमान खान-सलीम खान या बाप-लेकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय

बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि सलीम खान ही पिता-पुत्राची जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते. सलमानच्या करिअरमध्ये त्याचे वडील सलीम खान यांचा चांगलाच वाटा आहे. सलीम खान यांनी लेकाच्या वाईट-चांगल्या काळात सपोर्ट केलाय. अशातच सलीम-सलमान या बापलेकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत सलीम खान यांनी आयुष्यात जी पहिली बाईक खरेदी केलेली त्यावर बसून भाईजानने खास फोटोशूट केलंय.

सलीम-सलमान यांचा फोटो व्हायरल

२१ नोव्हेंबर २०२४ ला सलमान खानने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केलाय. यामध्ये पहिल्या फोटोत सलमानने सलीम खान यांच्या बाईक बसून खास पोझ दिली. त्यानंतर दुसऱ्या फोटोत भाईजान बाबांच्या बाजूला उभा राहून गप्पा मारताना दिसतो. सलमानने ब्लू टीशर्ट आणि डोक्यावर खास टोपी परिधान केलेली दिसते. तर सलीम यांनीही स्टायलिश शर्ट परिधान केलेलं दिसतं. "बाबांची पहिली बाइक, ट्रायम्फ टायगर १००", असं कॅप्शन देऊन सलमानने हा फोटो पोस्ट केला. १९५६ साली सलीम खान यांनी ही बाइक खरेदी केली.

सलीम - सलमान यांच्या फोटोवर चाहत्यांची पसंती

भाईजानने हा फोटो पोस्ट करताच त्याच्या चाहत्यांनी लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव केलाय. "बाप ऑफ बॉलिवूड", "लूकिंग हँडसम आणि क्यूट", "द दबंग" अशा कमेंट्स करुन लोकांनी सलीम आणि सलमान खान यांच्या या फोटोला पसंती दिलीय. अनेकांनी लव्ह इमोजी कमेंट्सच्या माध्यमातून पोस्ट करुन या फोटोवर प्रेम दर्शवलंय. सलमान सध्या 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. २०२५ ला हा सिनेमा लोकांच्या भेटीला येणार आहे.

 

टॅग्स :सलीम खानसलमान खान