Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाताला सलाईन, थकलेला चेहरा; इलियाना डिक्रुझचा रुग्णालयातील फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 17:59 IST

Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझने हॉस्पिटलमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चिंतेत पडले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'cruz) आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हॉस्पिटलमधील तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहते खूप चिंतेत आहेत. तिला काय झाले हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

इलियाना डिक्रुझने हॉस्पिटलच्या बेडवरून फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इलियाना फारच आजारी आणि थकलेली दिसत आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हाताला सलाईन लावलेलं दिसत आहे. हे फोटो शेअर करत इलियानाने पोस्टमध्ये लिहिलं की, एक दिवसही तुमच्या आयुष्यात खूप बदल घडवू शकतो… काही प्रेमळ डॉक्टर आणि आयव्ही फ्लुइड्सच्या तीन पिशव्या!

आणखी एक फोटो शेअर करत तिने तिच्या तब्येतीची अपडेट दिली आहे. इलियानाने म्हटले की, जे लोक माझ्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी मला मेसेज करत आहेत. त्यांचे खूप खूप आभार, मला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजते. मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी आता पूर्णपणे बरी आहे. मला वेळेत योग्य आणि चांगली मेडिकल ट्रिटमेंट मिळाली आहे.

इलियानाने बॉलिवूडसह साउथमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने वयाच्या १९ व्या वर्षी मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. इलियानाचा पहिला चित्रपट देवासु होता. या चित्रपटासाठी तिला दक्षिणेतील सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. इलियानाने रणबीर कपूरसोबत बर्फी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. नंतर ती ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘रेड’सारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटात झळकली.

टॅग्स :इलियाना डीक्रूज