Join us

आदिती द्रविडच्या अल्बमला सलीम मर्चंटचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 06:30 IST

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे.

ठळक मुद्देझिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत सलीम मर्चंटने गायले आहेझिलमिल’ हा अल्बम नुकताच लाँच झाला

माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. तिच्या गीताने सजलेला‘झिलमिल’ हा अल्बम नुकताच लाँच झाला.‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलीवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंटने गायले आहे.

आदिती द्रविड ह्याविषयी म्हणते, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की सलीमसरांनी माझ्या गीताला स्वरसाज चढवला आहे. बॉलीवूडमधल्या अशा एखाद्या नामवंत संगीतकाराने गीत गाण्याची संधी मराठी गीतकारांच्या आयुष्यात खूप कमी वेळेला येते. 2018मध्ये मी करिअरमध्ये मिळवलेल्या अचिवमेंन्ट्स पैकी ही सर्वाधिक आठवणीतली बाब म्हणता येईल.

”गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ‘झिलमिल’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोकेशन्स. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी या गाण्याचे शूट झाले आहे. हल्ली मराठी चित्रपट, गाणी यांचे शूटिंग परदेशात होऊ लागल्यामुळे प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

आदितीचा काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेला ‘यु एन्ड मी’ अल्बमही चांगलाच गाजला होता. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते. फुलवा खामकर हिने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले होते. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले होते. 

टॅग्स :अदिती द्रविडमाझ्या नवऱ्याची बायको