Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुला बॉयफ्रेंड आहे का? चाहत्याच्या प्रश्नाला रिंकू राजगुरुने इंग्रजीत दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 11:33 IST

आर्चीच्या रिअल लाईफ आयुष्यातील परश्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग काय, सोशल मीडियावर याबद्दलचे अनेक प्रश्न रिंकूला विचारले जातात.

ठळक मुद्देरिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर काही दिवसांपूर्वी तिचा ‘अनपॉज्ड’ हा चित्रपट रिलीज झाला.

‘सैराट’ या सिनेमाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) क्रेज अद्यापही कायम आहे. ही आर्ची जिथे जाईल, तिथे लोक गर्दी करतात.  चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी ताटकळत राहतात. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी जीवाचा आटापीटा करतात. आर्चीच्या रिअल लाईफ आयुष्यातील परश्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग काय, सोशल मीडियावर याबद्दलचे अनेक प्रश्न रिंकूला विचारले जातात.

नुकतेच रिंकूने #AskMeAnything हे सेशन केले. यावेळी तिने अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिलीत. एका चाहत्याने रिंकूला तिच्या बॉयफ्रेन्डबद्दल विचारले.

‘तुला बॉयफ्रेंड आहे का?’, असा प्रश्न या चाहत्याने विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना रिंकूने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. बॉयफ्रेन्ड आहे का, या प्रश्नाला रिंकूने ‘नो’ असे उत्तर दिले. आर्चीला रिअल लाईफमधील परश्या अद्याप भेटलेला नाही, हेच यावरून दिसतेय.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर काही दिवसांपूर्वी तिचा ‘अनपॉज्ड’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने काहीच दिवसांपूर्वी लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट ‘छूमंतर’चे शूटिंग पूर्ण केले आहे. ‘छूमंतर’ चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. ‘झुंड’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपटातही ती दिसणार आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरू