Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू बनली ‘मॉडेल’ अन् पप्पा बनले ‘फोटोग्राफर’; पाहा, आर्चीचं जबदस्त फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 12:24 IST

रिंकूने तिचं एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे... तिचे हे फोटो तिच्या पप्पांनी क्लिक केले आहेत.

ठळक मुद्देरिंकूची प्रमुख भूमिका असलेला ‘200 हल्ला हो’ हा दलित स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य करणारा सिनेमा अलिकडेच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

2016 मध्ये एक मराठी सिनेमा आला आणि या सिनेमानंच नाही तर या सिनेमातील नव्या कलाकारांनीही चाहत्यांना जणू याडं लावलं. होय, आम्ही बोलतोय ते ‘सैराट’ या सिनेमाबद्दल. या सिनेमातील आर्चीचं तर विचारूच नका. अख्खा महाराष्ट्र तिच्यावर फिदा झाला.  आचीर्ची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू  (Rinku Rajguru) एका रात्रीत स्टार झाली. आता ही आर्ची कुठल्या कुठं पोहोचलीये. मराठी सिनेमाचं नाही तर हिंदी सिनेमा, हिंदी वेबसीरिजमधून ती इंडस्ट्री गाजवतेय. सोशल मीडियावरही तिची चांगलीच हवा आहे.

तूर्तास रिंकूच्या नव्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत. विशेष काय तर हे फोटो तिच्या पप्पांनी क्लिक केले आहेत. आता पप्पांनी क्लिक केलेले इतके सुंदर फोटो रिंकू सोशल मीडियावर शेअर करणार नाही, हे शक्यचं नाही. तिच्या या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

रिंकूची प्रमुख भूमिका असलेला ‘200 हल्ला हो’ हा दलित स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य करणारा सिनेमा अलिकडेच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमातील रिंकूने साकारलेली आशा सुर्वे सर्वांनाच भावली. तिच्या या भूमिकेचं खुप कौतुक झालं. येत्या 17 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ घातलेल्या ‘अनकही कहानियां’ या चित्रपटात ती दिसणार आहे. यात चार वेगवेगळ्या कथा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यातल्या एका कथेत रिंकू दिसणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरू