Join us
Daily Top 2Weekly Top 5

आकाश ठोसरने बनवले डोले-शोले, पाहून तरुणींच्या काळजाचा ठोकाच चुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 14:42 IST

सैराटनंतर आकाशने काही सिनेमे वेबसिरीजमध्येही काम केले. त्याचदरम्यान त्याने स्वतःवरही प्रचंड मेहनत घेतली.

कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतात. 

अभिनेता आकाश ठोसरनेही सिद्ध केले आहे. बॉडी आधीच पिळदार होती. त्यात त्याला जाड दिसायचे असल्याने त्याच्या छाती, कमर आणि दंडावर जास्त मेहनत घेतल्याचे पाहायला मिळतंय. कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. तो छाती आणि कमरेवर जास्त लक्ष देतो. वजन वाढवण्यासह वरुणच्या एब्सवर जास्त लक्ष देण्यात आलं आहे.  तसंच त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले गेले.

 सैराटनंतर आकाशने काही सिनेमे वेबसिरीजमध्येही काम केले. त्याचदरम्यान त्याने स्वतःवरही प्रचंड मेहनत घेतली. म्हणून एक डॅशिंग अवतारात आकाशने अभिनयाप्रमाणे त्याच्या लूकमुळेही चाहत्यांची पसंती मिळवली होती. 

रुपेरी पडद्याप्रमाणे डिजीटल दुनियेतही सध्याच त्याचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. वॉर-एपिक सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स’मध्‍ये आकाश प्रमुख भूमिकेत आहे. यात आकाशने सैनिकाची भूमिका साकरली आहे.या भूमिकेसाठी त्याने  खुप मेहनत घेत डोले शोलेही बनवलेत...पिळदार शरीरयष्टीसह तो पुन्हा चाहत्यांसमोर आला आणि तरुणींच्या काळजाचा ठोकाच चुकला.

याविषयी त्याने सांगितले की, सैनिकाची भूमिका साकारण्‍याची पहिल्‍यांदाच संधी मिळाल्यामुळे माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. वास्‍तविक जीवनात मला जी संधी मिळाली नाही ती सैन्‍याचा पोशाख परिधान करण्‍याची संधी रील जीवनामध्‍ये मिळाल्‍याने खूप आनंद झाला. मला अत्‍यंत खास वाटले. त्याचबरोबर मी सैन्‍याचाच भाग आहे आणि मी स्‍वत:कडे त्‍याच दृष्टिने पाहिन. 

आकाशचं प्रत्येक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 'सैराट'पासून सुरु झालेला त्याचा कलाविश्वातील हा प्रवास सध्या कमालीच्या वेगानं पुढे जात आहे. तेव्हा आता आगामी काळात त्याचं कोणतं नवं रुप पाहायला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :आकाश ठोसर