Join us

सैफ अली खानसाठी २०२० ठरतंय खास, दुसऱ्यांदा देणार चाहत्यांना सरप्राईज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 18:15 IST

अभिनेता सैफ अली खानने ५० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी करिश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमूसोबत वाढदिवस साजरा केला.

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. याच सगळ्या गोष्टी खुद्द सैफ अली खान पुस्तकप्रेमींसाठी घेवून येणार आहे. लवकरच सैफ अली खान आत्मचरित्र लिहीणार आहे. यात त्याचे कटुंब, करिअर, यश-अपयश यासगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. नुकतेच सैफीना म्हणजेच सैफ आणि करिना लवकरच दुस-या बाळाला जन्म देणार असल्याची माहिती चाहत्यांसह शेअर केली होती. ही गुड न्युज वाचून चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्याचपाठोपाठ तो आत्मचरित्र वाचणेही त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असणार आहे. 'तान्हाजी' सिनेमातील त्याची  व्यक्तिरेखा सिनेसृष्टीतील स्थान अढळ करणारी ठरली.

अभिनेता सैफ अली खानने ५० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी करिश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमूसोबत वाढदिवस साजरा केला. सैफच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले. तसेच करीनाची एक मुलाखत देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामध्ये देखील तीने सैफ बद्दल खास गोष्टी सांगितल्या होत्या. 

सैफने अमृता सिंहसह पहिले लग्न करत संसार थाटला होता. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहे. काही कारणामुळे त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि परिणामी दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

 

त्यानंतर करिना कपूरसह सैफने २०१२ मध्ये लग्न करत पुन्हा एकदा आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली. तैमूरच्या जन्मानंतर बेबो म्हणेच करिनाही  आपले संसारिक आयुष्य  एन्जॉय करतेय.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर