Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेगम करिना कपूरने ‘नवाब’ला दिली खास पार्टी! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 11:59 IST

बॉलिवूडचा ‘नवाब’ अशी ओळख असणारा सैफ अली खान आज त्याचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. काल १२ च्या ठोक्याला सैफच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले.

बॉलिवूडचा ‘नवाब’ अशी ओळख असणारा सैफ अली खान आज त्याचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. काल १२ च्या ठोक्याला सैफच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले. बेगम करिना कपूरने सैफच्या वाढदिवसानिमित्त एक जंगी पार्टी दिली. सर्व जवळच्या मित्रमंडळींनी या पार्टीला उपस्थिती लावली होती. करिनासह, सैफची मुलगी सारा अली खान, मुलगा इब्राहिम, बहीण सोहा अली खान, कुमार खेमू, करिश्मा कपूर असे सगळे या पार्टीत होते. केवळ सैफची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंह मात्र या पार्टीपासून दूर राहिली.

सैफच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनकरता करिनाने रात्रीपासूनच तयारी केली होती. त्याची मुलगी सारा अली खान व मुलगा इब्राहीम हे दोघेही या पार्टीत उपस्थित होते.

सावत्र आई करिना कपूर त्याच्यांसोबत अगदी फ्रेंडली पोज देताना दिसली. अगदी जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत सैफचा ग्रॅन्ड वाढदिवस साजरा करण्यात आला.सैफच्या वाढदिवसाची करिनाने जय्यत तयारी केली होती.

तुम्हाला ठाऊक आहेच की, अमृता व सैफचे लग्न १२ वर्षांपूर्वी संपुष्टात आले होते. दोघांनीही २००४ मध्ये एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. यानंतर सैफच्या आयुष्यात करिनाचा एन्ट्री झाली. २०१२ मध्ये दोघांनीही लग्न केले.

टॅग्स :सैफ अली खान