Saif Ali Khan Attack Case Update: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये घुसून एका चोराने जीवघेणा हल्ला केला होता. आरोपीने झटापटीत सैफवर ६ वेळा चाकूने वार केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. तात्काळ रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी १९ जानेवारी रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम असल्याचं तपासात समोर आलं. इतकंच नाही तर शरीफुल हा बांगलादेशी नागरिक आहे. सध्या आरोपीविरोधात खटला सुरू आहे. नुकतंच पोलिसांनी याप्रकरणात पोलिसांनी तब्बल १ हजार ६०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये पोलिसांनी शरीफुलचा कबुलीजबाब देखील नोंदवला आहे.
सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी काय करत होता, याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. कुबलीजबाबात आरोपीनं म्हटलं की, सैफच्या घरातून पळून गेल्यानंतर तो मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता. त्याने वेशभुषा बदलली आणि दादर रेल्वे स्टेशनबाहेरून ५० रुपयांचे इअरफोन विकत घेतले होते. या इअरफोनद्वारे मोबाइलमधील गाणी ऐकून तो स्वत:ला तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
आरोपीनं खुलासा केली की, तो सैफच्या घरात शिरण्यापूर्वी इमारतीची रेकी केली होती. तर हल्लानंतर तो पोलिस तपासाविषयी समोर येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवून होता. युट्यूबद्वारे तो अपडेट घेत होता. "सैफ अली खानचे चित्रपट पाहिले असले तरी त्या रात्री मी त्याला ओळखू शकलो नाही. हल्ल्याच्यावेळी खोलीत खूप अंधार होता आणि सैफ क्लीन शेव्हमध्ये होता. त्यामुळे मी त्याला ओळखू शकलो नाही", असं आरोपीनं सांगितलं.
पोलिसांनी आरोपत्रात नमुद केलं आहे की, सैफच्या पाठीतून काढण्यात आलेला २ इंचाचा चाकूचा तुकडा, आरोपींकडून जप्त केलेला चाकूचा तुकडा आणि गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला भाग, हे तिघेही एकाच चाकूचे आहेत.