Join us

सोहा व्यतिरिक्त सैफची दुसरी बहीण कधीच नसते लाइमलाइटमध्ये, सांभाळते पतौडींची कोट्यवधींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 15:01 IST

सबा आता 42 वर्षांची असून अद्याप तिने लग्न केलेले नाही. सबाने इतरांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर केले नाही, तर ती ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वतःचा बिझनेस आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे पतौडी कुटुंब. हे कुटुंब  कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं.पतौडी कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात शर्मिला टागौर त्यांचा मुलगा सैफ अली खान, मुलगी सोहा अली खान त्यानंतर सारा अली खान  तैमूर प्रत्येक व्यक्तींची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. पण शर्मिला टागौर यांची आणखी एक मुलगी सबा अली खान ही कधीच चर्चेत नसते. 

सैफची सक्की बहीण सोहा अली खानच सा-यांना माहिती आहे. मात्र सोहा व्यतिरिक्त सैफला आणखी एक सक्की बहीण आहे ती आहे सबा अली खान.आश्चर्याची बाब म्हणजे सबाविषयी फारसे कुणाला काही फारशी माहीत नाही. सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्टीजपासून  कायम दूर राहणारी सबा अली खान 2700 कोटींची मालकिण आहे.

फॅमिली फंक्शन वगळता ती सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत नाही. सबा आता 42 वर्षांची असून अद्याप तिने लग्न केलेले नाही. सबाने इतरांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर केले नाही, तर ती ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वतःचा बिझनेस आहे. पतौडी घराण्यातील अनेक जण बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत.

पण सबा सिनेसृष्टीपासून कायम लांब राहणे पसंत करते. सोहा प्रमाणेच सबाचेही वहीनी करिना कपूरसही चांगले बॉन्डींग आहे. वहिनी करिनासाठी सबानेहमीच ज्वेलरी डिझाइन करत असते. सबा ही सैफची लहान बहीण आहे.सबा सोशल मीडियावरही जास्त सक्रीय नसते. सोहापेक्षाही सबा तिच्या बिझनेसमुळे खूप व्यस्त असते. मध्यंतरी सोशल मीडियावर ती सक्रीय होती.

करिना तैमूरचा फोटो शेअर करत कौतुक केले होते. तसेच सारा अली खानचा भाऊ इब्राहिमचाही फोटो शेअर करत त्याचेही कौतुक करताना सबा दिसली होती. कुटुंबाच्या सदस्यांचे फोटो शेअर करणारी सबा जास्त लाइमलाइटमध्ये कधी आली नाही. त्यामुळे सबाचा सोहाबरोबरचा फोटो पाहून चाहतेही संभ्रमात पडताना दिसत आहे. 

टॅग्स :सोहा अली खानसैफ अली खान