Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्याच बिल्डिंगमध्ये सई मांजरेकरने खरेदी केला फ्लॅट; म्हणाली, "मला गर्व आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:31 IST

महेश मांजरेकरांच्या लेकीने त्यांच्याच बिल्डिंगमध्ये खरेदी केला फ्लॅट, म्हणाली...

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. वडिलांकडूनच अभिनयाचे धडे घेत मांजरेकरांची लेक सई हिनेदेखील सिनेइंडस्ट्रीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. सलमान खानच्या 'दबंग ३'मधून सईने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये सई महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. 'कुछ खट्टा हो जाए' या सिनेमातून सई प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती अभिनेता गुरू रंधावाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

सईने या सिनेमाच्या निमित्ताने नुकतीच 'नवभारत टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला "मुलगी असण्याचा सगळ्यात जास्त अभिमान केव्हा वाटला? आणि मुलगी असल्यामुळे कधी हिनवलं गेलं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सई म्हणाली, "नुकतंच मी आणि माझ्या वडिलांनी एकाच बिल्डिंगमध्ये घर घेतलं. तेव्हा मला स्वत:चा अभिमान वाटला. मला या गोष्टीचा आनंद आहे. मला माझ्या आईवडिलांसाठी खूप काही करायचं आहे. खूप काम केलं, आता आराम करूया, असं त्यांना एक दिवस वाटलं पाहिजे. आणि तेव्हा त्यांना त्या सर्व सुविधा मी देऊ शकेन, एवढी उंची मला गाठायची आहे." 

पुढे अपमानाबद्दल ती म्हणाली, "बऱ्याचदा तुमचा अपमान थेट केला जात नाही. कधी कधी तुम्हाला अपमान केल्याचं कळतंही नाही. जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं की एक मुलगी असल्यामुळे मला अशा प्रकारची वागणूक मिळाली. पण, या गोष्टींची सवय झाल्यामुळे त्या तुम्हाला अनेकदा नॉर्मलही वाटू लागतात." सई ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. मेधादेखील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.  

टॅग्स :सई मांजरेकरमहेश मांजरेकर सेलिब्रिटी