Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही पडाल सारा तेंडुलकरच्या प्रेमात, बॉलिवूड बालांना देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 15:18 IST

ग्लॅमर इंडस्ट्रीत साराची एन्ट्री झालेली नाही. पण बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपेक्षा तिचे ग्लॅमर कमी नाही.

ठळक मुद्देसाराचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.

बॉलिवूड स्टार किड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, तैमूर यांच्या रांगेत आता आणखी एका स्टारकिडची एन्ट्री झाली आहे. तिचे नाव आहे, सारा तेंडुलकर. होय, भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर. ग्लॅमर इंडस्ट्रीत साराची एन्ट्री झालेली नाही. पण बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपेक्षा तिचे ग्लॅमर कमी नाही. सोशल मीडियावरचे साराच्या ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.

प्रकाशझोतापासून दूर राहणारी सारा सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.  

 सारा सध्या शिकतेय. मध्यंतरी बॉलिवूड डेब्यूची चचार्ही रंगतेय. अनेक चाहते, तिच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. बॉलिवूडमध्ये येण्याचा साराचा कुठलाही इरादा नाही. पण हो, तिचा चाहता वर्ग मात्र मोठा आहे.

इन्स्टाग्रामवर साराचे 6 लाखांवर फॉलोवर्स आहेत.

साराचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. तिचा फॅशन सेन्स गजब आहे.

तुम्हाला ठाऊक नसेल पण क्रिकेटचा  देव सचिन त्याच्या जीवनात साराला त्याची प्रेरणा मानतो. यामागचे कारण म्हणजे, अगदी अल्लड वयात साराने वडिलांना चांगले काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा.

स्वत:पेक्षा दुस-याबद्दल विचार करणा-या सारानेच सचिनला चॅरेटीमध्ये दान करण्याचे सांगितले. खुद्द सचिनने एका मुलाखतीत हे सांगितले होते. सचिन कोणत्याही कार्यक्रमात त्याच्या मुलीचे कौतुक करायला विसरत नाही. तो साराला स्वत:ची प्रेरणा सांगतो.

टॅग्स :सारा तेंडुलकरसचिन तेंडुलकर