Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन बामगुडे आणि स्वप्नील जोशी लवकरच येणार एकत्र, पण नक्की काय असेल कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 09:45 IST

हा नवा प्रोजेक्ट काय आहे? हा सिनेमा आहे का? टीव्ही मालिका किंवा वेब सीरिज? नाटक ? की आणखी काहीतरी?

ठळक मुद्देअलीकडच्या काळात सचिन बामगुडे यांनी ‘लव्ह यू ज़िंदगी’ नावाच्या एका सुपरहिट चित्रपटाची निर्मिती केली होती.

पुण्यातील प्रसिद्ध फायनान्स कंपनी एस. पी. एंटरप्रायझेसचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सचिन बामगुडे लवकरच मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी याच्यासोबत नवा प्रोजेक्ट सुरू करणार आहेत. सचिन बामगुडे यांनी स्वप्निल जोशीसोबत कालच्या फेसबुक लाइव्ह सेशनमध्ये या विषयी संकेत दिलेत.  लवकरच काहीतरी नवीन येणार आहे, असे त्यांनी सांगितले. पण हा नवा प्रोजेक्ट काय आहे? हा सिनेमा आहे का? टीव्ही मालिका किंवा वेब सीरिज? नाटक ? की आणखी काहीतरी? ते अजूनही गुलदस्त्यातच आहे. आपल्याला त्याची अजून वाट पाहावी लागेल.

उद्योजक सचिन बामगुडे हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, पुण्यातील एका सुप्रसिद्ध फायनान्स कंपनीचे, एस. पी. एंटरप्रायजेसचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. २००८ साली स्थापन झालेल्या या कंपनीने बराच लांबचा पल्ला गाठला आहे आणि आता हळूहळू या कंपनीने मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, सुरत, उदयपूर, जयपूर, हैदराबाद, भोपाळ, इंदौर आणि गोव्यासह भारतातील अनेक शहरांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. सचिन बामगुडे यांनी नक्कीच अनेक उद्योजकांना यशाचा मार्ग दाखवला आहे.

अलीकडच्या काळात सचिन बामगुडे यांनी ‘लव्ह यू ज़िंदगी’ नावाच्या एका सुपरहिट चित्रपटाची निर्मिती केली होती. ज्यात सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहेरे अशा नामांकित कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच व्यवसाय केला आणि तो हिट ठरला. 

बामगुडे यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे आम्हाला नक्कीच आनंद झाला आहे आणि लवकरच येऊ घातलेल्या या नव्या प्रोजेक्टबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. अर्थात, एम-टाऊनमधील एक सुपरस्टार आणि एक लोकप्रिय उद्योजक यांच्या नावांचा समावेश होतो. तेव्हा बातमी वाट पाहण्यासारखीच आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशी